Breaking News

शिक्षकांच्या बदली रद्दचा अट्टाहास धरू नका.

जामखेड  तालुक्यातील नान्नज येथील मोहळकर वस्ती येथे जिल्हा परिषद प्रथमिक शाळा येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले.यावेळी शिक्षकांच्या बदली रद्दचा अट्टाहास धरू नका असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी पोपट काळे यांनी जामखेड तालुक्यातील नान्नज (मोहळकर वस्ती) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाप्रसंगी आयोजित कार्यक्रमात केले. 

यावेळी जामखेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, नगरसेवक निखिल घायतडक, शिवसेना तालुकाप्रमुख शहाजी राजेभोसले, नान्नज ग्रामपंचायतीचे माजी संरपच संतोष पवार, बोर्ले गावचे सरपंच भारत काकडे, अ‍ॅड. अल्लाउद्दीन शेख, पाणी फौंडेशनचे नितीन मोहळकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय मोहळकर, नान्नज जि. प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जालिंदर राऊत, केंद्रप्रमुख निळकंठ घायतडक, सुरेश कुंभार, बुध्दीवंत आदी मान्यवरांसह पालक-शिक्षक महिला वर्ग व विद्यार्थी बहूसंख्येने उपस्थीत होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक बाबासाहेब कुमटकर यांनी करुन उपस्थित मान्यवरांचा सत्कार शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी गटशिक्षणाधिकारी काळे म्हणाले की, पुर्वी शिक्षकांच्या बदल्या जिल्हास्तर व तालुकास्तर अंतर्गत पंचायत समिती स्तरावर या बदल्या होत होत्या मात्र, आता ऑनलाईन पध्दतीने बदल्या होत असल्याने कोणीही शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्याचा अट्टाहास धरू नका, कोणीही शाळेला कुलूप ठोकू नका. इंटरनेटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. मुलांनी काय पहावयाचे व काय नाही पहावयाचे हे विद्यार्थ्यांनी ठरवावे. मोहळकर वस्तीसाठी 5 वीचा वर्ग पात्र असून येथील मुलांचे कौतुक मोठ्या मनाने करण्याचेे सांगुन गटशिक्षणाधिकारी काळे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कला व नृत्याने पालकांची मने भरून आली होती. उपस्थित नागरिकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून भरभरून आर्थिक मदत केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकम महाराज यांनी तर, उपस्थितांचे आभार प्रशांत कुंभार यांनी मानले.