Breaking News

आ. थोरातांच्या पाठपुराव्यातून घारगांव, जवळेबाळेश्‍वरसह 6 पाणी पुरवठा योजनांना मंजुरी - अजय फटांगरे


संगमनेर, सततच्या विकासकामांतून मॉडेल ठरलेल्या संगमनेर तालुक्यात मा. महसूल मंत्री रायाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे व इंद्रजीत भाऊ थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेकडून तालुक्यातील घारगांव, जवळेबाळेश्‍वर, गोडसेवाडी, कोकणगांव, पारेगांव खुर्द, हिवरगांव पावसा येथील पाणी पुरवठा योजनांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती जि.प. कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय फटांगरे यांनी दिली आहे.
संगमनेर तालुक्यातील काही राहिलेल्या गावांसाठी मुबलक व स्वच्छ पाणी मिळावे यासाठी आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्हा परिषदेकडुन जिल्हा परिषद सदस्यांनी सतत पाठपुरावा करुन राष्ट्रीय पेयजल योजनेतून 5 कोटी 66 लाख 77 हजार रुपये निधीच्या सहा पाणी पुरवठा योजना मंजुर केल्या आहेत. यामध्ये गोडसेवाडी 1 कोटी 24 लाख, कोकणगांव 1 कोटी 52 लाख 64 हजार, पारेगांव खुर्द 53 लाख 48 हजार, हिवरगांव पावसा 65 लाख, घारगांव 86 लाख 55 हजार व जवळेबाळेश्‍वर 85 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. यासाठी जि.प. सदस्य रामहरी कातोरे, भाऊसाहेब कुटे, महेंद्र गोडगे, सिताराम राऊत, मिलींद कानवडे, सौ. मिराताई शेटे, सौ. शोभाताई खैरे, पंचायत समितीच्या सभापती सौ. निशाताई कोकणे, उप सभापती नवनाथ आरगडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

तालुक्यात प्रत्येक गावात वाडीवस्तीवर पाणी देण्यासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांनी विविध योजना राबविल्या आहेत. तळेगांवची 16 गावांना पाणी पुरवठा योजनेसाठी थोरात कारखान्याची यंत्रना सतत मदत करत आहे. पानोडी पाणी पुरवठा योजना तातडीने सुरु करावी यासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांची बैठक घेवून ही योजना तातडीने कार्यान्वीत करणाच्या सुचना दिल्या आहेत. वनकुटे इतर गावांच्या योजना ही लवकरच सुरु होणार आहे.

तालुक्यात सहा योजना मंजूर झाल्याने घारगांव, जवळेबाळेश्‍वर, गोडसेवाडी, कोकणगांव, पारेगांव खुर्द, हिवरगांव पावसा या गावांसह शेजारील वाडीवस्तींच्या पाणीप्रश्‍न कायमचा सुटणार असून या गावांमधील नागरीकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.