Breaking News

तेजस्वी यादव यांची 50 कोटींची संपत्ती जप्त

पाटणा : लालू यादव यांच्या कुटुंबावर आयकर विभागाने पुन्हा कारवाई केली आहे. आयकर विभागाने लालू यांचा मुलगा तेजस्वी यादवची जमीन आणि विमानतळाजवळील एक घर जप्त केले आहे. एवढेच नाही तर विभागाने निनावी मालमत्ता अधिनियमांतर्गत कारवाई करताना जप्त केलेल्या मालमत्तेवर नोटीसही चिकटवली आहे. आयकर विभागाने गुरुवारी कथित शेल कंपनी फेयरग्लो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या अखत्यारीतील इमारत जप्त करून त्यावर नोटिस चिकटवली आहे. पाटणा विमानतळाजवळ असलेल्या या इमारतीचे मुल्य साधारणपणे 50 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. ही जमीन जवळपास 7105 वर्ग फुट आहे. आयकर विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही जमीन लालू प रिवाराने फेअरग्लो कंपनीच्या नावे मिळवल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ही कंपनी एक शेल कंपनी असल्याचे सांगितले जात आहे. याच कंपनीची मालकी असलेले आलिशान भवन आयकर विभागाने जप्त केले आहे. येथे सध्या कुणीही राहात नाही. तसेच याच्या एका भागाचे कामही सध्या सुरू आहे. लालू कुटुंबाच्या बेनामी संपत्तीप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी प्रसाद यादवविरुद्ध आरोपपत्र दाखल झाल्यानंतर आयकर विभागाने ही कारवाई केली आहे.