Breaking News

बालमटाकळी येथे केंद्रस्तरिय प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन उस्साहात

भाविनिमगाव प्रतिनिधी - शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केंद्रस्तरीय वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. चिमुकल्या मुलांनी लहानग्या हातापायांना व कमरेला लचके देत सुरेल पद्धतीने मनमोहक अशा मराठी लावण्यांच्या व ढोलकीच्या तालावर बालकांनी सादर केलेल्या नृत्य अविष्कराने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य मिळवुन स्नेहसंमेलनालनाचे रंगमंच गाजवुन सोडत प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या. बालमटाकळी येथे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेचे वार्षिक स्नेहसम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन व सरस्पती पुजन गट शिक्षण अधिकारी बाळासाहेब बुगे, सरपंच कौशल्याबाई कवडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मल्हारी घुले आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

लहान-लहान मुलांनी आपल्या नाजुक हाता पायांना, कमरेला आकार देत स्नेहसंम्मेलनाच्या रंगमंचावर ढोलकीच्या तालावर नृत्य अविष्कार सादर करताना नववारीतून रंभा, अप्सरेचे सुरेल असे दर्शन घडविले, डोळ्यांचे पारणे फिटवणार्‍या या स्नेहसंम्मेलनाच्या कार्यक्रमातुन लावणी नृत्य हिंदी, मराठी रेकॉर्ड गाण्यावर नृत्य करुण मला लागली कुणाची गुचकी, लख्ख पडला प्रकाश दिव्यांच्या मशालीचा अशा विविध मराठी गीताबरोबरच राजस्थानी घूंमर डांस , लेक वाचवा देश वाचवा, ही अंगावर शहारे आनणारी हृदयस्पर्शी नाटिका लहान मुलींनी सादर करुण प्रेक्षकांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आणले. शेतकरी आत्महत्तेचे नेमके कारण काय , मुलींच्या हुंडयापायी बाप आपली पत गहान ठेवतो वेळेला कुठलीच उपाययोजना झाली नाही तर बापाला आत्महत्तेशिवाय पर्याय उरत नसून बाबा तुम्ही आत्महत्या करू नका हुंडा मागणार्‍याशी आमचा विवाह करू नका, अशा पद्धतीने मुलगी आपल्या बापाला माझ्यामुळे आत्महत्त्या करुण जीव गमावु नका असे समाजप्रबोधनपर नाटिका सादर केल्या याला शाळेच्या शिक्षिका श्रीमती वाघमारे, राउत, नरसाळे यांच्या सुरेल सूत्रसंचालनाची व प्रेक्षकांच्या टाळ्यांची साद प्रत्येक वेळी मिळत होती. 
यावेळी शिक्षक बँकेचे अध्यक्ष रावसाहेब रोहकले, विकास मंडळाचे अध्यक्ष संजय शिंदे , जिल्हा संघटक विकास डावखरे, श्रीकृष्ण खेडकर, कल्याण कोकाटे, रामनाथ राजपुरे, दुर्योधन काळे सह मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. तर कार्यक्रम यशस्वितेसाठी शाळेच्या शिक्षिका लवांडे, वडते, कदम, बांगर, टकले, पुरुषोत्तम, तोटेवार आदींनी परिश्रम घेतले , तर परिसरातील सर्वच शाळेचे शिक्षक वर्ग व पालक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.