मुंबई : राज्यभरात मागील वर्षी (2017) 35 हजार अपघात झाले असून, त्यात 12 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये प्रामुख्याने 20 ते 40 या वयोगटातील संख्या जास्त आहे. राज्यातील रस्ते अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत असल्याची बाब चिंताजनक आहे. यासाठी सरकारने हाती घेतलेल्या रस्ता सुरक्षेच्या मोहिमेला सोमवारपासून (23 एप्रिल) प्रारंभ होत आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात एकूण 743 अपघातग्रस्त ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. 2017 या वर्षात एकूण 35 हजार 853 अपघात झाले. या वर्षात एकूण 12 हजार 264 व्यक्ती रस्ते अपघातात मृत पावल्या तर 32 हजार 128 व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. यात प्रामुख्याने 20 ते 45 या वयोगटातील व्यक्तींची संख्या मोठी असल्याचे आढळले आहे. राज्यातील रस्त्यांवरील वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेत राज्य शासनाने रस्ता सुरक्षेची मोहीम हाती घेतली आहे. आज सोमवार दि. 23 एप्रिलपासून या मोहिमेला प्रारंभ होणार आहे. राज्यातील अपघातग्रस्त ठिकाणांवर सुधारात्मक उपाययोजना शासनाकडून करण्यात येत आहेत. राज्यातील वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र तपासणीसाठी देशातील पहिले स्वयंचलीत चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. राज्यात 35 परिवहन कार्यालयात ब्रेक तपासणी चाचणीची सुविधा उभारण्यात आल्याची माहिती राज्य सरकारच्या परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे. राज्यात मार्च अखेरपर्यंत 3 लाख 28 हजार नोंदणीकृत वाहने आहेत. 3 लाख 40 हजार परवानाधारक वाहनचालक आहेत. राज्यातून प्रवास करणारी आणि राज्याबाहेरील वाहनांची मोठी संख्या आहे. देशपातळीवर अपघाती मृत्यू या निकषावर राज्याचा तिसरा क्रमांक लागतो. राज्यातून प्रवास करणार्या आणि राज्याबाहेरील वाहनांची मोठी संख्या हे एक मोठे आव्हान असल्यामुळे जनजागृती करण्यात येत असल्याचे परिवहन विभागाने सांगितले आहे.
राज्यात 2017 मध्ये अपघातात 12 हजार जणांचा मृत्यू
Reviewed by Dainik Lokmanthan
on
08:34
Rating: 5