Breaking News

अपुर्‍या निधीमुळे संयुक्त राष्ट्राला अपयश

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांततापूर्ण प्रयत्नांना राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे पुरेसा निधी मिळत नसल्याचा मुद्दा, भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या उच्चस्तरीय बैठकीत उपस्थित केला. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता राखण्याच्या प्रयत्नांसाठी उपलब्ध असलेला निधी हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या वार्षिक अर्थसंकल्पाच्या एक टक्का सुद्धा नाही, असे यावेळी भारताच्या परराष्ट्र मंत्र्यालयाचे अतिरिक्त सचिव गितेश शर्मा यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुटेरेस आणि महासभेचे अध्यक्ष मिरोस्लाव लॅजॅक यांनीही शांततापूर्ण प्रयत्नांसाठी निधीचा अभाव असल्याची कबुली दिली. म्हणून संयुक्त राष्ट्राच्या सदस्यांना शांततापूर्ण प्रयत्नांच्या निधीसाठी दरवर्षी 500 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स उभे क रण्याची आवाहन गुटेरेस यांनी केले. याला भारताच्या शर्मा यांनीही पाठींबा दिला.