Breaking News

दहशतवादी-जवानांमध्ये चकमक, पुलवामामधील मोबाईल इंटरनेट सेवा बंद

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सोमवारी सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवादी यांच्यामध्ये चकमक सुरू आहे. राष्ट्रीय रायफल्स (आरआर), केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपच्या (एसओजी) पोलिसांनी दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर ड्रबगाम गावाला घेरले. गावाला घेरल्यानंतर लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान सुरक्षा दलावर दगडफेक करण्यात आल्याचेही वृत्त आहे. पुलवामा जिल्ह्यातील मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.