14 नक्षलवाद्यांचा खात्मा सी-60 पोलीस पथकाची कारवाई.
गडचिरोली : जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील बोरिया जंगलात पोलिसांनी केलेल्या कारवाईत 14 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. चौदा नक्षलवादी ठार झाल्याची माहिती नक्षलविरोधी अभियानाचे पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांनी दिली आहे. आतापर्यंत च्या गड़चिरोलीच्या इतिहासात एवढ्या मोठ्या संख्येने नक्षलवादी ठार होण्याची ही पहिली वेळ आहे. मागच्याच महिन्यात सिरकोंडा जंगलात झालेल्या चकमकीत 3 नक्षलवादी ठार झाले होते. त्यामुळे लागोपाठ झालेल्या या धक्कमुळे नक्षल चळवळीस मोठा धक्का बसला आहे.
या चकमकीत काही डीव्हीसी व कमांडर्सचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास सी-60 पथकाचे जवान ताडगाव परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना बोरिया जंगलात पोलिस व नक्षल्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. ही चकमक तब्बल 11 वाजतापर्यंत सुरु होती. या चकमकीत 14 नक्षलवाद्याचा संपूर्ण दलच ठार झाल्याचे सांगण्यात येत असून, काही कमांडर व उच्चपदस्थ नक्षली या चकमकीत ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. नक्षल्यांच्या विभागीय समितीचा सदस्य साईनाथ, सिनू व अन्य काही कमांडर या दलासोबत होते. पोलिसांनी 13 नक्षल्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. जिल्ह्यात नक्षल चळवळीचा शिरकाव झाल्यापासूनच्या 38 वर्षांतील पोलिसांनी केलेली ही सर्वांत मोठी कारवाई आहे. 2013 मध्ये अहेरी तालुक्यातील गोविंदगाव येथे पोलिसांनी 6 नक्षल्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले होते. त्यानंतर 6 डिसेंबर 2017 रोजी सिरोंचा तालुक्यातील कल्लेड येथील जंगलात पोलिसांनी 7 नक्षल्यांचा खात्मा केला होता. या दोन घटनांनंतरची ही 14 नक्षली ठार करण्याची सर्वांत मोठी कारवाई आहे.
सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळाले असून मृतांमध्ये जहाल नक्षलवाद्यांचा देखील समावेश आहे. भामरागड तालुक्यातील कसणासुर-बोरिया जंगलात नक्षलवादी दडल्याची माहिती मिळाली होती. यामाहितीवरून सी-60 पथकाने सर्च ऑपरेशन हाती घेतले होते. त्यादरम्यान रविवारी सकाळी 11 वाजता नक्षल आणि पोलिसांमध्ये भीषण चकमक उडाली. काही नक्षलवादी जंगलामध्ये पसार झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणावर नक्षल साहित्य आणि शस्त्रे जप्त केली आहेत. भामरागड तालुका हा नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. चकमकीनंतर जंगलात कोम्बिंग ऑपरेशन चालू करण्यात आले आहे.