पुण्यात पोलिसांच्या घरांचे बांधकाम दीड वर्षात पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
पोलीस हा महत्त्वाचा घटक असून त्यांच्या हक्काचे घर त्यांना मिळावे, यासाठी दोन वर्षापूर्वी पोलिसांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावला आहे. पोलीस विभागाच्या जागेबाबत पुणे महानगरपालिकेने तडजोड करून पोलिसांच्या घरांचे बांधकाम येत्या दीड वर्षात पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
शिवाजीनगर (पुणे) विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित कामांबाबत आढावा बैठकीत मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, आमदार विजय काळे,महापौर मुक्ता टिळक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव (१) नितीन करीर, प्रधान सचिव (२) मनीषा म्हैसकर, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त किरण गित्ते, मनपा आयुक्त कुणाल कुमार, गृहविभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.