डॉ. किरण कोकाटे पुरस्काराने सन्मानित
राहुरी ता. प्रतिनिधी - महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. किरण दत्तात्रय कोकाटे यांना प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘फेलो ऑफ इंटरनॅशनल सोसायटी ऑफ नोनी सायंन्स’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कृषि महाविद्यालय, पुणे येथे झालेल्या इंटरनॅशनल सोसायटी ऑफ नोनी सायंन्स यांच्या वार्षिक बैठकीत सोसायटीचे अध्यक्ष डॉ किर्ती सिंग आणि सचिव डॉ. के. व्ही. पीटर यांच्या हस्ते डॉ. कोकाटे यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. डॉ. कोकाटे हे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण असून या आधी पाच वर्षे ते नवीदिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेत विस्तार विभागाचे उपमहासंचालक म्हणून कार्यरत होते. भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचा ‘शेतकरी प्रथम’ कार्यक्रमाचे त्यांना जनक मानले जाते. महात्मा फुले कृषि विद्यापीठात संचालक, विस्तार शिक्षण या पदावर काम करताना त्यांनी विस्तार शिक्षणाला नवीन दिशा दिली.