अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा काढल्याचा निषेध तहसीलदारांना दिले निवेदन
राहुरी प्रतिनिधी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा बुलढाणा जिल्ह्यातील पुतळा पोलिस प्रशासन व जातीयवादी लोकांनी काढल्याच्या निषेधार्थ राहुरी तालूक्यातील विविध संघटनांच्यावतीने तहसीलदार व पोलिस प्रशासनाला नुकतेच निवेदन देण्यात आले.
बुलढाणा जिल्ह्यात चिरवली तालूक्यातील इसरुळ गावामध्ये लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा गावातील काही जातीयवादी लोकांसह पोलिस प्रशासनाने काढून टाकला. त्यामुळे समस्त मातंग समाजासह फुले, शाहू, आंबेडकर चळवळीतील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. सदर प्रकरणाची विचारणा करण्यासाठी मातंग समाजातील काही लोक गेले असता पोलिस प्रशासनाने त्यांच्यावर लाठी हल्ला केला. या या घटनेतील पोलिस अधिकारी तसेच जातीयवादी लोकांची चौकशी करुन लवकरात लवकर पुतळा पूर्ववत ठिकाणी सन्मानपूर्वक बसविण्यात यावा. तसेच तात्काळ त्या पोलिस अधिकार्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा लहूजी शक्ती सेनेच्यावतीने राज्यभर तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, असा देण्यात आला आहे.