Breaking News

कुळधरण प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्ह्यात नंबर वन विनम्र व तत्पर सेवा हीच बनली केंद्राची ओळख

कुळधरण: किरण जगताप - कर्जत तालुक्यातील कुळधरण प्राथमिक आरोग्य केंद्राने राष्ट्रीय गुणवत्ता मानांकनाप्रमाणे सर्व निकष पूर्ण करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत कायाकल्प पुरस्कार संपादन केला.यामध्ये राज्य शासनाचे २ लाख रुपयांचे बक्षीस प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रदान करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागात शासनाच्या वैद्यकीय सेवेचा विस्तार वाढत चाललेला आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध होवु लागल्या असून केंद्र कात टाकु लागली आहेत.विविध नाविन्यपूर्ण समाजोपयोगी उपक्रम राबवत आरोग्य केंद्रांचे रूप पालटण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून होत आहेत.आरोग्य केंद्रामध्ये स्वच्छ व आरोग्यदायी वातावरणात आरोग्य सुविधा मिळाव्यात तसेच या कामात सातत्य रहावे यासाठी शासनाने प्रोत्साहनपर बक्षीस योजना सुरु केलेली आहे.त्यात कुळधरण प्राथमिक आरोग्य केंद्राने प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवत आपल्या सेवेतुन दर्जा सिद्ध केला आहे.कुळधरण केंद्राने गेल्या वर्षीही ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस मिळविले होते.विनम्र,तत्पर व समाधानकारक आरोग्य सेवा ही कुळधरणच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची ओळख बनली आहे.

जिल्हा गुणवत्ता आश्वासन सल्लागार डॉ.राहुल शिंदे यांनी आरोग्य केंद्रांमध्ये झालेल्या बदलांचे फोटो,रेकॉर्ड व कायाकल्प परीक्षण अहवाल राज्य स्तरावर पाठविला होता.त्यातुन कुळधरण केंद्राची निवड करण्यात आली.तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदीप पुंड,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे,जिल्हा प्रशिक्षण अधिकारी डॉ. विनोद काकडे,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बापुसाहेब नागरगोजे,ग्रामविकास संघटनेचे कार्यकर्ते,पदाधिकारी तसेच रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष व सदस्य यांच्या सहकार्यामुळे पुरस्कार मिळू शकला असल्याची प्रतिक्रिया केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.टी.सोनवणे यांनी दिली.विभागाने ठरवुन दिलेली सर्व उद्दिष्टे पूर्ण केली जातात.२०१६-१७ मध्ये १५२ तर या वर्षातील आतापर्यंत १६८ डिलिव्हरी केंद्रातुन करण्यात आल्याचे डॉ.सोनवणे यांनी सांगितले.

◾कुळधरण आरोग्य केंद्र आणि पुरस्कार

कुळधरणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी सामूहिक तसेच वैयक्तिक असे अनेक पुरस्कार संपादन केलेले आहेत.केंद्राला २०११-१२ तसेच २०१४-१५ चा आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार प्राप्त झालेला आहे.डॉ.बी.टी.सोनवणे यांना २०१४-१५ तसेच २०१५-१६ चा जिल्हा परिषदेचा आदर्श वैद्यकीय अधिकारी पुरस्कार मिळाला.त्यांना कुळधरण ग्रामविकास संघटनेचा २०१७ या वर्षीचा आदर्श आरोग्य अधिकारी पुरस्कार माजी मंत्री सुरेश धस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.आरोग्य सेविका मनिषा जाधव यांना ८ मार्च २०१८ रोजी अहमदनगर जिल्हा परिषदेचा फ्लोरेन्स नाईंट्गेल पुरस्कार मिळाला.स्वप्नील शिंदे यांनी २०१४-१५ चा आदर्श आरोग्य सेवक पुरस्कार संपादन केला.श्रीम.जे.ए.पठाण यांना सलग दोन वर्षे आदर्श आरोग्य सहाय्यिका पुरस्कार मिळालेला आहे.

◾या केंद्रांना मिळणार प्रत्येकी ५० हजार

जिल्ह्यातील दहा आरोग्य केंद्रांना या प्रकल्पांतर्गत ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाणार आहे.यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी व आढळगाव,श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव,टाकळीभान,निमगाव खैरी व माडवळगाव,नगर तालुक्यातील वाळकी व रुईछत्तीसी तसेच राहाता तालुक्यातील कोल्हार व दाढ बु. केंद्रांचा समावेश आहे.कुळधरण: किरण जगताप
कर्जत तालुक्यातील कुळधरण प्राथमिक आरोग्य केंद्राने राष्ट्रीय गुणवत्ता मानांकनाप्रमाणे सर्व निकष पूर्ण करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत कायाकल्प पुरस्कार संपादन केला.यामध्ये राज्य शासनाचे २ लाख रुपयांचे बक्षीस प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रदान करण्यात येणार आहे.

ग्रामीण भागात शासनाच्या वैद्यकीय सेवेचा विस्तार वाढत चाललेला आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध होवु लागल्या असून केंद्र कात टाकु लागली आहेत.विविध नाविन्यपूर्ण समाजोपयोगी उपक्रम राबवत आरोग्य केंद्रांचे रूप पालटण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून होत आहेत.आरोग्य केंद्रामध्ये स्वच्छ व आरोग्यदायी वातावरणात आरोग्य सुविधा मिळाव्यात तसेच या कामात सातत्य रहावे यासाठी शासनाने प्रोत्साहनपर बक्षीस योजना सुरु केलेली आहे.त्यात कुळधरण प्राथमिक आरोग्य केंद्राने प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवत आपल्या सेवेतुन दर्जा सिद्ध केला आहे.कुळधरण केंद्राने गेल्या वर्षीही ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस मिळविले होते.विनम्र,तत्पर व समाधानकारक आरोग्य सेवा ही कुळधरणच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची ओळख बनली आहे.

जिल्हा गुणवत्ता आश्वासन सल्लागार डॉ.राहुल शिंदे यांनी आरोग्य केंद्रांमध्ये झालेल्या बदलांचे फोटो,रेकॉर्ड व कायाकल्प परीक्षण अहवाल राज्य स्तरावर पाठविला होता.त्यातुन कुळधरण केंद्राची निवड करण्यात आली.तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदीप पुंड,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे,जिल्हा प्रशिक्षण अधिकारी डॉ. विनोद काकडे,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बापुसाहेब नागरगोजे,ग्रामविकास संघटनेचे कार्यकर्ते,पदाधिकारी तसेच रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष व सदस्य यांच्या सहकार्यामुळे पुरस्कार मिळू शकला असल्याची प्रतिक्रिया केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.टी.सोनवणे यांनी दिली.विभागाने ठरवुन दिलेली सर्व उद्दिष्टे पूर्ण केली जातात.२०१६-१७ मध्ये १५२ तर या वर्षातील आतापर्यंत १६८ डिलिव्हरी केंद्रातुन करण्यात आल्याचे डॉ.सोनवणे यांनी सांगितले.

◾कुळधरण आरोग्य केंद्र आणि पुरस्कार

कुळधरणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी सामूहिक तसेच वैयक्तिक असे अनेक पुरस्कार संपादन केलेले आहेत.केंद्राला २०११-१२ तसेच २०१४-१५ चा आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार प्राप्त झालेला आहे.डॉ.बी.टी.सोनवणे यांना २०१४-१५ तसेच २०१५-१६ चा जिल्हा परिषदेचा आदर्श वैद्यकीय अधिकारी पुरस्कार मिळाला.त्यांना कुळधरण ग्रामविकास संघटनेचा २०१७ या वर्षीचा आदर्श आरोग्य अधिकारी पुरस्कार माजी मंत्री सुरेश धस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.आरोग्य सेविका मनिषा जाधव यांना ८ मार्च २०१८ रोजी अहमदनगर जिल्हा परिषदेचा फ्लोरेन्स नाईंट्गेल पुरस्कार मिळाला.स्वप्नील शिंदे यांनी २०१४-१५ चा आदर्श आरोग्य सेवक पुरस्कार संपादन केला.श्रीम.जे.ए.पठाण यांना सलग दोन वर्षे आदर्श आरोग्य सहाय्यिका पुरस्कार मिळालेला आहे.

◾या केंद्रांना मिळणार प्रत्येकी ५० हजार

जिल्ह्यातील दहा आरोग्य केंद्रांना या प्रकल्पांतर्गत ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाणार आहे.यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी व आढळगाव,श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव,टाकळीभान,निमगाव खैरी व माडवळगाव,नगर तालुक्यातील वाळकी व रुईछत्तीसी तसेच राहाता तालुक्यातील कोल्हार व दाढ बु. केंद्रांचा समावेश आहे.