Breaking News

लासलगांव येथे गाडीची काच फोडून व्यापार्‍याचे पाच लाख पळविले

लासलगाव, दि. 01, मार्च - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारातून विंचूर येथील धान्य व कांदा व्यापार्‍याची स्विफ्टची गाडीची काच फोडून अज्ञात चोरट्यानी पाच लाख रुपयांची लाल रंंगाची पिशवी लंपास केल्याची घटना आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली या धाडसी चोरीमुळे व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, विंचूर येथील भुसार मालाचे व्यापारी ईश्‍वर अशोक ढवण यांनी आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास विंचुर रोडवरील क्सिस बँकेतून पाच लाख रुपये शेतकर्‍यांना चुकवती देण्यासाठी काढले. सदर रक्कम घेऊन स्विफ्ट गाडी क्र.चक15ऊच् 3613 मध्ये ड्रायव्हर शिटाजवळील शिटाच्या खाली पैशाची लाल रंगाची पिशवी ठेवून लासलगाव बाजार समितीच्या आवारात वर्दळ असलेल्या ठिकाणी गाडी लावली व अगदी दहा फुटावर असलेल्या व्यापारी मित्राकडे गेले असता डाव्याबाजूकडील काच फोडून लाल रंगाची पिशवी अज्ञात चोरट्यानी लंपास करून पोबारा केला.