अक्कलकुव्यात पावणेतीन लाखांचा मद्यसाठा जप्त
नंदुरबार, दि. 07, मार्च - नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालूक्यात एका किराणा दुकानात नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागाने टाकलेल्या छाप्यात 2 लाख 88 हजार रुपये किमतींचा मद्यसाठा जप्त करण्यात आला.तर एका आरोपीस अटक केली.
एका किराणा दुकानात बेकायदा मद्याची विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. यात संजय परदेशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका किराणा दुकानात बेकायदा मद्याची विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. यात संजय परदेशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.