Breaking News

निकृष्ट बांधकामाची चौकशी करण्याची मागणी


जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या शेवगाव शाखेच्या नवीन इमारतीचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाले आहे. या कामाची चौकशी करण्याची मागणी परिवर्तन मंडळाच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हा उपनिबंधक अनिल दाबशेडे यांना नुकतेच देण्यात आले. 

यावेळी संचालक अप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, अंबादास राजळे, चांगदेव खेमनर, सभासद सुनिल दानवे, नंदकुमार शितोळे, मंगेश काळे, भाऊसाहेब जिवडे आदी उपस्थित होते.