Breaking News

अखेर डांबरीकरणाला मुहूर्त मिळाला

सोनई : येथील सोनई-कांगोणी रस्त्याच्या डांबरीकरणाला तब्बल महिनाभराच्या कालावधीनंतर सुरुवात झाली. सोनई ते मुथा डिपीपर्यंतच्या दीड किलोमीटर रस्त्याचे खडीकरण महिन्याभरापूर्वी झाले होते. मात्र डांबरीकरण रखडले होते. 


यासाठी संबंधित ठेकेदार करत असलेल्या दिरंगाईविषयी परिसरात प्रचंड नाराजी पसरली होती. मात्र या रस्त्याचे डांबरीकरण सुरु झाल्याने या भागातील ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, या रस्त्याचे काम निकृष्ट झाल्यास ठेकेदाराला काळे फासण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.