Breaking News

अण्णांच्या मागण्या मान्य करा : मागणी


ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या समाजहिताच्या विविध मागण्या मान्य करुन त्यांना आंदोलनापासून परावृत्त करण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनसंसदच्यावतीने करण्यात आली. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना निवेदन देण्यात आले. दिल्ली येथे दि. २३ मार्चपासून सुरु होणार्‍या त्यांच्या आंदोलनाला जाहिर पाठिंबा व्यक्त करण्यात आला.

 यावेळी अध्यक्ष सुधीर भद्रे, राज्य निमंत्रक अशोक सब्बन, सरचिटणीस कैलास पठारे, अशोक ढगे, भा. को. साळवे गुरुजी, रामराव पाटील भदगले, जनार्दन शेजूळ, यादव पावसे, शंकर फटांगरे, पोपट साठे, रंजन लोखंडे, बापूसाहेब कदम, सुभाष तांबे, आसिफ शेख, बबलू खोसला, भाऊसाहेब सुद्रिक, शब्बीर पठाण आदि उपस्थित होते.