Breaking News

समस्यांनी भिंगारकर हैराण


भिंगारवासियांच्या मूलभूत समस्या काही केल्या सुटायला तयार नाहीत. छावणी मंडळाचे पदाधिकारी आणि प्रशासन याबाबत अजिबात गंभीर नाही, असा आरोप केला जात आहे. भिंगारमधील गाडेकरगल्ली, दाणेगल्ली, भोयरे तालीम, ब्राम्हणगल्ली, सरपणगल्ली, मोमीनगल्ली आदी ठिकाणी पिण्याचे पाणी, रस्ते आदी मूलभूत समस्यांनी येथील नागरिक हैराण झाले आहेत. या समस्यांप्रमाणेच येथे नियमितपणे नाले सफाई होत नसल्याबद्दल नागरी आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नळांना वेळेवर आणि पुरेशा दाबाने पिण्याचे पाणी येत नसल्याबद्दल महिलांमध्ये छावणी मंडळ प्रशासन आणि पदाधिकार्यांविषयी नाराजी आहे.