चारुदत्त आफळे यांना पुरस्कार प्रदान
सावेडी येथील ज्येष्ठ नागरिक मंच्यावतीने राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांना विज्ञान पुरस्कार प्रदान करण्यात आला. मंचच्या अध्यक्षा ज्योती केसकर यांच्या हस्ते आफळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रावसाहेब पटवर्धन स्मारकात हा कार्यक्रम पार पडला. आफळे यांनी २४ वर्षांत ४ हजारांच्यावर कीर्तनाद्वारे लाखो श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. अमेरिका, कॅनडा, दुबई, कुवेत, आस्ट्रेलिया आदी ठिकाणी त्यांनी कीर्तनाचा झेंडा फडकविला. त्यांच्या या गौरवाबद्दल अनेकांनी आफळे यांचे अभिनंदन केले.