Breaking News

गुढीपाडवा : साडेतीन मुहुर्तांपैकी एक


चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा होणारा गुढीपाडवा साडेतीन मुहुर्तांपैकी एक आहे. शालिवहन शकाचा प्रारंभ याच दिवसापासून होतो. शालिवहनाने मातीच्या सैन्यातही प्राणांचा संचार केला ही लाक्षणिक कथा आहे. याच दिवशी श्रीरामाने वालीच्या त्रासातून दक्षिणेच्या प्रजेला मुक्त केले होते. या मुक्त झालेल्या प्रजेने उत्सव साजरा करत गुढया उभारल्या होत्या. त्यामुळेच या दिवसाला गुढीपाडवा हे नाव मिळाले आहे. नवसंवत्सराचा प्रारंभ भारतात चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून होतो. नववर्षाचा हा पहिला दिवस अतिशय पवित्र आणि महत्वाचा मानला जातो. आपणा मराठी माणसांच्या दृष्टीने गुढी पाडव्याला आणखी एक महत्वाची बाजू आहे. गुढी पाडव्याला पंचांगपूजन केले जाते. पंचांग ह्या विषयात महाराष्ट्रातील विद्वानांनी लक्षात घेण्यासारखी कामगिरी केली आहे.