विविध कार्यकारी सोसायटीच्या सदस्यांचे सामूहिक राजीनामे .
सचिवांच्या गैरव्यवहारांमुळे शेवगावच्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या सर्व संचालकांनी सामूहिक राजीनामे दिले. याप्रकरणी हकिगत अशी की, सन 2014/15 साली शेवगाव विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक म्हणून बारा सदस्य निवडून आले. त्यानंतर वसंत विनायक लांडे यांची तर संजय आंबादास देवढे यांची व्हा. चेअरमन म्हणून निवड करण्यात आली. या सोसायटीचे सचिव म्हणून महेश भास्कर लांडे काम पाहत होते. मात्र दुसरीकडे सचिव महेश लांडगे शेतकर्यांचे, कर्जदाराचे, खातेदारांचे पैसे स्वीकारत, परंतू त्याचा भरणा ते बँकेत करत नसत. याबाबत संचालक मंडळाने 12 एप्रिल 2016 रोजी मा. सहाय्यक निबंधक, शेवगाव यांच्याकडे नवीन सचिव मिळावा असा तक्रार अर्ज केला तक्रार अर्ज केला.