Breaking News

रत्नागिरी जिल्हा व्यापारी महासंघाचे भाऊ वंजारे अध्यक्ष

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्हा व्यापारी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी लांजा येथील प्रथितयश व्यापारी व सहकार, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अग्रणी श्रीराम तथा भाऊ वंजारे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
रत्नागिरी जिल्हयातील प्रमुख व्यापार्‍यांची सभा नुकतीच चिपळूण येथील काणे बंधू हॉलमध्ये पार पडली. या सभेत रिक्त असणार्‍या जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीबाबत चर्चा करण्यात आली. जिल्हाध्यक्षपदावर लांजातील श्रीराम तथा भाऊ वंजारे यांचे नाव उद्योजक सुरेश साठे यांनी सुचविले. त्याला लांज्यातील ज्येष्ठ व्यापारी खलिल मणेर यांनी अनुमती दिली. या नावावर उपस्थितांनी एकमुखी पाठिंबा दर्शविण्यात आल्यानंतर वंजारे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.