Breaking News

आयुक्तांवर तातडीने कारवाई करण्याच्या मागणीवरुन विधानसभेत गदारोळ


मुंबई - औरंगाबादचे मनपा आयुक्त व पोलीस आयुक्तांवर तातडीने कारवाई करण्याच्या मागणीवरुन विधानसभेत गदारोळ झाला. त्यानंतर सभागृह 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते.विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्षवेधी मांडली होती. पोलीस आयुक्तांना तातडीने निलंबित करण्याची आणि मनपा आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती.