पनवेल / मुंबई, - पनवेल येथे बेकायदेशीरपणे रहाणार्या पाच बांगलादेशी नागरिकांना एटीएसने अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील चार जणांकडे आधार कार्डही आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पनवेलमधील जुई गाव भागात ते राहत होते. या नागरिकांचे दहशतवादी गटांशी संबंध आहेत का याची चाचपणी एटीएस करीत आहे.अनधिकृतरित्या 5 बांगलादेशी नागरिक पनवेल भागात राहत असल्याची बातमी एटीएसला मंगळवारी मिळाली होती. त्यानुसार, एटीएसच्या पथकाने त्यांच्या ठिकाणांवर छापे मारले आणि त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. वीस ते चाळीस वर्षीय वयाच्या हे पाच बांगलादेशीं आहेत.
पनवेल येथे पाच बांगलादेशी नागरिकांना एटीएसकडून अटक
Reviewed by Dainik Lokmanthan
on
16:45
Rating: 5