Breaking News

विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी भरीव प्रयत्न : दंडवते


जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आणि विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सवर्तोपरी प्रयत्न करणार आहोत, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते यांनी केले.

कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बालआनंद मेळाव्याच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये विशिष्ट कला, गुण असत्तात. विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यात येणा-या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी बालआनंद मेळावे अतिशय स्तुत्य उपक्रम आहेत. या बाल आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांच्या कला, गुणांना चालना मिळणार आहे. 

यावेळी पंचायत समिती सभापती अनुसया होन, उपसभापती अनिल कदम जि. प. सदस्य विमल आगवन, पंचायत समिती सदस्य पोर्णिमा जगधने, गटविकास अधिकारी कपिलनाथ कलोडे, गटशिक्षण अधिकारी शबाना शेख, केंद्रप्रमुख इंगळे, रोहिदास होन, कडवे आदींसह विद्यार्थ्यांचे पालक व चासनळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन वाघमारे यांनी केले.