Breaking News

रस्ता दुरुस्तीची मागणी;५ मार्च रोजी आंदोलनचा इशारा

पाथर्डी / प्रतिनिधी/- पाथर्डी ते मढी (धामणगाव मार्ग) रस्त्याची दुरुस्ती करून योग्य त्या उपाय योजना कराव्या यासाठी कार्यकारी अभियंता (प्रधानमंत्री ग्रामसडक योजना,अहमदनगर यांच्या नावाने पाथर्डी नगरपालिकेच्या नगरसेविका संगिता गटांनी यांनी बुधवारी निवेदन दिले.तसेच रस्त्याची दुरुस्ती जर येत्या ५ मार्च रोजी माणिकदौडी चौक (संस्कार भवन) येथे सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आंदोलन करण्यात येण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.


त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भटक्याची पंढरी म्हणून सबोधल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ महाराजांची यात्रा होळी पासून सुरू होत आहे. होळी ते गुडीपाढवा या दरम्यान चालनाऱ्या यात्रेत राज्यासह देशभरातुन लाखो भाविक नाथाच्या दर्शनासाठी येतात. या मार्गावर धामणगाव येथे दिवेचे मंदिर असुन श्री क्षेत्र मढी व मायबाला जाताना भाविकांना याच मार्गाचा अवलंब करावा लागतो.मंगळवार,गुरवार,शुक्रवार आमावस्या प्रदोष नवरात्र यासह वर्षभर विविध उसत्वनिमित्त या रोडवरती खूप मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.

...सध्या या रोडवरती खड्डे पडले आहेत.तसेच रस्त्याच्या दुतर्फा बाजुला रस्त्या खचून विविध ठिकाणी कपारी पडल्या आहेत.यामुळे या रस्त्यावर छोटे मोठे अपघात घडतात.तरी येणाऱ्या यात्रा काळात अपघात होऊन कुठल्याही प्रकारची दुर्दैवी घटना घडू नये यासाठी मढी कडून पाथर्डी कडे येताना मढी घाटाच्या सुरवातीला व त्याच मार्गावर माहिती व दिशादर्शक फलक लावावेत तसेच या रस्त्यावरील खडे आणि कपारी बुजवून त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली