Breaking News

कल्याण-डोंबिवलीत प्रथमच पार्‍याने ओलांडली चाळीशी


डोंबिवली, दि. 27, मार्च - कल्याण डोंबिवलीत मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पहाटेस हलक्या गुलाबी थंडीची आनंद नागरिक घेत असले तरी मात्र दुपारच्या कडक उन्हात पारा 43 डिग्री गाठल्याने दुपारी रस्त्यावर शुकशुकाट दिसला. महिन्याच्या अखेरीस कल्याण व डोंबिवलीत यावर्षी प्रथमच पारा 43 डिग्री पर्यंत गेल्याने नागरिक त्रस्त झाले. तापमानात पहिल्यादा चाळीशी पार के ल्याने पुढे मे महिन्यात काय होईल असे प्रश्‍न विचारले जात आहेत. वातावरणातील बदलाने तापमान वाढीचे परिणाम कल्याण डोंबिवलीतही पाहायला मिळत आहेत. येथील तापमानात अचानक मोठी वाढ झाली. आज दुसर्‍या दिवशीही कल्याण डोंबिवलीतील पार्‍याने सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास चाळीशी ओलांडली. गेल्या आठवड्यात आधी ढगाळ वातावरण नंतर रात्री पावसाच्या सरी, मग मध्येच वातावरणात रात्रीच्या सुमारास आलेला गारठा असे बदल काही दिवस पाहायला मिळाले. अचानक कल्याण डों बिवलीतील तापमानाने उसळी घेतली. यंदाच्या मौसमातील सर्वाधिक उष्ण दिवस ठरला. त्याचीच पुनरावृत्ती आजही झाली. आज सकाळपासून पुन्हा वातावरण चांगलेच तापलेले जाणवले. सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पार्‍याने पस्तीशी ओलांडलेली पाहायला मिळली. सकाळी 9.37 वाजण्याच्या दरम्यान कल्याणात 35.7 डिग्री सेल्सिअस इतक्या चढ्या तापमानाची नोंद झाली. दरम्यान वाढत्या तापमानाला तोंड देण्यासाठी नागरिकांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे डॉक्टरांनी आवाहन केले आहे. वाढत्या तापमानाला तोंड देण्यासाठी ऊसाच्या रसाची दुकाने भरली असून थंड पेयांची मागणी वाढली आहे वाढत्या तापमानाला तोंड देण्यासाठी नागरिकांनी गॉगल, टोपी यांचा वापर करावा असे आवाहन डॉक्टर करत आहेत. डोंबिवलीत मात्र तापमानाची नोंद करणारी अजूनही सोय नाही. स्मार्ट सिटीची स्वप्ने दाखविणार्‍यानी याचा विचार केला पाहिजे.