धुळे जिल्ह्यात लाचखोर अधीक्षक जाळ्यात
धुळे, दि. 27, मार्च - धुळे जिल्ह्यातील अर्थ खुर्द ता. शिरपूर येथील आश्रमशाळेचा अधीक्षक सुनील शिवाजी खराटे (30) यास सात हजारांची लाच घेताना धुळे एसीबीने सेामवारी सायंकाळी रंगेहाथ अटक केली. आरोपी खराटेने शिरपूर येथील ठेकेदाराकडून पीठ दळून आणण्याच्या टेंडरचे बिल अदा करण्यासाठी लाचेची मागणी केल्याने तक्रार करण्यात आली होती. ही कारवाई धुळे एसीबीचे उपअधीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रदीप देसले व सहका-यांनी केली. याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एसीबीचे आधिकारी करीत आहेत.