Breaking News

द्रोणाचार्य कोचिंग क्लासेसचा इ.10 वीच्या विद्यार्थ्यांना निरोप


द्रोणाचार्य कोचिंग क्लासेसचा इ.10 वी. निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. सालाबादप्रमाणे याही वर्षी द्रोणाचार्य कोचिंग क्लासेसचा इ. 10 वी. च्या 6 व्या बॅचचा निरोप समारंभ कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्याख्याते लहू जायभाये होते. त्यांनी विद्यार्थांना सातत्यपूर्ण व प्रामाणिकपणे प्रयत्न करून यश प्राप्तीचा कानमंत्र दिला. तसेच प्रा. दाते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी ऋतुजा डोंगरे, पंडित भाग्यश्री, बुचकुल नवनाथ, ओम सानप, लांडे पल्लवी, आचल गुप्ता या विद्यार्थांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच प्रा. पायघन, प्रा. ठोंबळ, प्रा. खरड, प्रा. काटकर, प्रा. जालिंदर ढाकणे व चेतन दाते यांनी विद्यार्थांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन क्लासेसच्या विद्यार्थिनी अंकिता पवार व अर्चना मुटकुळे यांनी केले. शेवटी प्रा. पायघन यांनी आभार प्रदर्शन केले.