Breaking News

रामजन्मानिमित्त ज्ञानयज्ञ आणि किर्तन महोत्सव


नेवासाः तालुक्यातील मुकिंदपुर येथे श्रीराम साधना आश्रमात रामजन्म सोहळ्यानिमित्त ज्ञानयज्ञ व किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हभप भास्करगिरी महाराज यांच्या प्रेरणेने व महंत सुनिलगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य दिव्य सोहळा दि. २२ ते २५ या कालावधीत मोठ्या दिमाखात संपन्न होत आहे.

यावेळी श्रीराम जन्म उत्सवानिमित्त सकाळी श्रीरामचंद्राच्या मूर्तीची वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यादरम्यान, हभप मुक्ताई महाराज, हभप रुपाली महाराज यांचे किर्तन होईल. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीराम सेवा मंडळ मुकिंदपुर, त्रिवेणीश्वर भक्त परीवार, सप्ताह पारायण कमिटी, नेवासा फाटा आणि तरुण मंडळ प्रयत्न करत आहे.