उच्चशिक्षित तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या
दुसऱ्या दिवशी पहाटे ५:३० वा. त्याची आई लताबाई दातीर या उठल्यानंतर अंगणातील साफसफाई करत होत्या. मोटारसायकल अंगणामध्ये असल्याने त्यांनी ती बाहेर काढण्यासाठी बाबूनाथला आवाज दिला. परंतु त्याने प्रतिसाद न आल्याने त्यांनी दरवाजा ढकलला तर तो उघडाच होता. आत जाऊन पाहिले तर बाबूनाथ यांनी घरातील अँगलला गळफास घेतल्याचं पाहिल्याने त्यांनी तिथेच हंबरडा फोडला. आवाज ऐकून घरातील वडील व शेजारील नातेवाईक धावून आले. त्यानंतर त्यांनी त्याची कल्पना टाकळी टोकेश्वर पोलिस स्टेशनला दिली. पोलिस घटना स्थळी आले त्यानंतर टाकळी टोकेश्वर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले . धूलिवंदनाची सुट्टी असल्याने नगरहून डॉक्टर येण्यास उशीर झाला व नंतर पोस्टमॉर्टम करून नंतर अंत्यविधी कासारे येथे करण्यात आला.