पर्यावरण मुक्त होळी, आगळे-वेगळे कौतुक
होळीसाठी लाकूड जाळल्यासाठी मोठया प्रमाणांत वृक्षतोड केली जाते. त्यामुळे पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात धोका पोहचतो. तसेच रंगपंचमीला रासायनिक रंग न वापरता घरच्या घरी नैसर्गीक रंगाचा वापर करून होळी व रंगपंचमी साजरी करण्याचे आवाहन शिक्षक आशिष दापके यांनी केले. मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील कचरा जमा करून, स्वच्छतेचा संदेश देऊन एक आदर्श अशी कचरा होळी साजरी करून पर्यावरण मुक्त, पाण्याची बचत, एक मुलांना एक अनोखा संदेश देऊन होळी साजरी करण्यात आली. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपस्थित होते. दरम्यान या कचरा होळीचे सर्वत्र कौतुक होत आहे.