पाथर्डी पोलिसाची जुगार आणि दारूवर कारवाई
याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की,अरुण मुरलीधर शेकडे यांनी दिलेल्या फिर्यदित म्हटले आहे की,बुधवारी दुपारी पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांना गुप्त खबरीदारामार्फत खात्रीलायक माहिती मिळाली की करोडी ते चिंचपूर कडे जाणाऱ्या चिंचपूर इजदे फाट्यावर रोडलगत पत्र्याच्या टपरीच्या आडोश्याला देव अण्णा राजे, अण्णा कोंडावार हा विनापरवाना देशी दारूची विक्री करतो.
या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पेठकर यांनी,पोलीस कॉन्स्टेबल निलेश म्हस्के,समीर शेख यांना सोबत घेऊन समजलेल्या माहिती ठिकाणी जाऊन छापा टाकला. त्या ठिकाणी उभा असलेल्या देव अण्णा राजे, अण्णा कोंडवारा हा तिथे ६००रु. किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या सहित आढळून आला.
तसेच दुसऱ्या फिर्यदित फिर्यादी समिर गुलाब शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,आखरभागात तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याची बातमीदारामार्फत गुप्त माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे शहरातील आखारभागात उघड्या शेड मध्ये ८ जण गोल रिंगण करून काही तरी करत असल्याचे निदर्शनास आले.
त्यावेळी तिथे पोलीस उपनिरीक्षक पेठकर,पोलीस कॉन्स्टेबल निलेश म्हस्के,अरुण शेकडे,यांनी तिथे अचानक छापा टाकला असता, त्यां ठिकाणी ८ इसमाना तिर्रट नावाचा जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्या कडून त्यांना ८ हजार रुपये आणि जुगाराचे साहीत्यासोबत ताब्यात घेण्यात आले.
