‘संजीवनी’च्या विद्यार्थ्यांची कंपन्यांमध्ये नोकऱ्या : डॉ. आरोटे
पत्रकात डाॅ. आरोटे यांनी सांगीतले आहे की टाटा कन्सलटन्सी सर्विसेस, मुंबई या कंपनीने कु. अंकिता कोल्हे, कु. शीतल लोहकणे व संकेत मुथाल यांची निवड केली. तर नोवोकेअर फार्मास्युटीकल्स आणि चैतन्य फार्मास्युटीकल्स या कंपन्यांनी अक्षय क्षिरसागर, अभय जगताप, सागर वधे, ओकार धनवटे, शुभम दफुरे व गौरव शेटे यांची निवड केली. हे सर्व विद्यार्थी बी. फार्मसीच्या अंतिम सत्रात शिकत आहे.
ते म्हणाले, की माजी मंत्री व संजीवनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष माजी आ. शंकरराव कोल्हे यांच्या शिकवणीनुसार संस्थेचे कार्य अव्याहतपणे सुरु आहे. ते सांगतात, की प्रथम वर्षात विध्यार्थी संजीवनीमध्ये प्रवेश घेतो, तेव्हा संजीवनीमध्ये आपला पाल्य दाखल झाला म्हणजे तो १०० टक्के स्वयंपूर्ण होऊन त्याच्यासाठी ‘संजीवनी’च रोजगार मिळवून देईल. पालकांचा हा विश्वास सार्थ करण्यासाठी संजीवनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे आई मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केले जात असल्याचे प्राचार्य डॉ. आरोटे म्हणाले. यावेळी आ. स्नेहलता कोल्हे यांनी विध्यार्थ्यांचे यश आणि कोपरगांव विधानसभा मतदार संघातील विध्यार्थ्यांना संजीवनीच्या माध्यमातून नोकऱ्या मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. नितीन कोल्हे व अमित कोल्हे यांनीही या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. संस्थेचे ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट अधिकारी डाॅ. प्रकाश केंद्रे व प्रा. सोमनाथ विभुते यांनी यासाठी विशेष परीश्रम घेतले.