Breaking News

नाशिकमधील ड्रग्ज कनेक्शनच्या मुळाशी जाऊन कारवाई करण्याची मागणी

मुंबई / नाशिक, दि. 20, मार्च - सौदी अरेबियातून थेट नाशिकला कुरियरमार्फत ड्रग्ज कनेक्शनचा विषय आज आ.जयवंतराव जाधव यांनी विधानपरिषदेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे मांडून या प्रक रणाची सखोल चौकशी करून या प्रकरणाच्या मुळाशी जावून तातडीने कारवाई करण्याची मागणी सभागृहात केली.


आ.जाधव यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे बोलताना म्हटले की, मंत्रभूमी ते तंत्रभूमी असा आश्‍वासक प्रवास करणार्‍या या पवित्र भूमीचा नाशिककरांना कोण अभिमान वाटतो पण आता हीच पावनभूमी अंमली पदार्थ तस्करीच्या आंतरराष्ट्रीय नकाशावर आल्याचा धक्का पचविणे अवघड आहे. नाशिकमध्ये बसून कुरिअर कंपनीच्या मदतीने संशयित रॅकेटमार्फत ड्रग्ज वितरणाचे काम केले जात असल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. त्यामुळे कोलकत्ता नार्कोटिक्स युनिटने संबधित कुरिअर कंपनीचा डेटा तपासण्याचे काम हाती घेतले आहे. ही व्याप्ती नाशिकपर्यंत पोहोचली आहे सौदी अरेबियातून थेट नाशिकला कुरिअरमार्गे हे ड्रग्ज येत असत अन येथून त्याचे वितरण होत असल्याचे पुढे आले आहे. या व्यवहारात बिटकॉईन या भारतात बंदी असलेल्या आभासी चालनाचाही वापर झाल्याचे स्पष्ट होत आहे. नार्कोटिक्स विभागाने या प्रकरणाचा छडा लावून मोठे काम केले असते तरी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन यातील सहभागींना जेरबंद करण्यासाठी शासनाने तातडीने क ारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.