Breaking News

इगतपुरीत डान्सपार्टी; 10 संशयित ताब्यात

नाशिक, दि. 20, मार्च - इगतपुरी जवळील तळेगाव शिवारात रस्त्यावर मद्यप्राशन करून बारबालांसह पार्टी करणार्‍या नाशिकच्या 10 जणांसह मुंबई परिसरातील सहा बारबालांना पोलिसांनी धाड टाकून अटक केली. इगतपुरी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला असून ताब्यात घेतलेल्यांमध्ये नाशिकमधील एका पत्रकार संघटनेचा कथित अध्यक्षही असल्याची पोलिसांनी मा हिती दिली असून धाड पडल्यानंतर हा पत्रकार म्हणविणारा या कथित पदाधिकार्‍याने पोलिसांवर दबाव टाकल्याचा प्रकारही पुढे येत आहे.


या संदर्भात ग्रामीण पोलिसांकडून मिळालेली विस्तृत माहिती अशी की, इगतपुरी जवळील तळेगाव शिवारातील हॉटेल परिसरातून मोठमोठ्याने डीजेवर गाणे वाजविल्याचा आणि तोकड्या कपड्यात महिलांचे अश्‍लिल नृत्य सुरू असल्याने स्थानिक नागरिकांनी पोलिसांनी कळविले. त्यानंतर ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा आणि इगतपुरी पोलिसांनी इगतपुरी तालुक्यातील तळेगाव शिवारातील हॉटेल मिस्टीक व्हॅली, बंगला नंबर 9 च्या पुढील मोकळ्या जागेत संबंधित प्रकार सुरू असताना धाड टाकली. तेथून दहा पुरुष आणि दहा महिलांना ताब्यात घेतले. या सर्व महिला बारबाला असल्याचे चौकशीत समजले. या सर्वांना पोलिसानी अटक करून इगतपुरीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 294, 34 आणि मुंबई पोलीस कायदा 112/117 याप्रमाणे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.