Breaking News

जमिनीच्या वादातून एकावर प्राणघातक हल्ला

जामखेड तालुक्यातील सातेफळ, येथील जमीनीच्या वादातून एकावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. आरोपी उध्दव क्षिरसागर, पप्पू क्षिरसागर, सागर बाळू राऊत या तीन आरोपींना अटक करुन त्यांना आज जामखेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 


पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादीवरून जामखेड तालुक्यातील सातेफळ येथील शेतीच्या वादातून क्षिरसागर कुटुंबातील दिगंबर क्षिरसागर व एकनाथ क्षिरसागर या दोघा चुलत भावांमध्ये शेतीचा वाद कोर्टात सुरू होता, परंतू कोर्टाचा निकाल फिर्यादी दिगंबर क्षिरसागर याच्या बाजूने लागला होता, त्यामुळे दिगंबर हा शेतातील ऊस तोडणी करत होता. त्यावेळी एकनाथ याने त्यास प्रतिबंध केला. या झटापटीत दिगंबर क्षिरसागर याच्यावर आरोपी उध्दव अनंता क्षिरसागर, पप्पू उध्दव क्षिरसागर, सागर बाळू राऊत, राजू उध्दव क्षिरसागर, रेखाबाई उध्दव क्षिरसागर, आशाबाई बाळू राऊत, बालाजी (पुर्ण नाव समजले नाही) सर्व राहणार सातेफळ या सर्व आरोपीं नं 2 यांनी फिर्याद दिली. दिगंबर बबनराव क्षिरसागर याला हातातील चाकूने तोंडावर पाठीवर तसेच उजव्या दंडावर मारुन व वडील सोडविण्यासाठी आले असताना त्यांच्याही कानावर चाकू मारुन जबर जखमी केले असून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच तुम्ही परत शेतात आलात तर तुमचे मुडदे पाडू असे म्हणून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. यामध्ये फिर्यादी यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले. त्यास खर्डा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. परंतू त्यांचेवर प्राथमिक उपचार करून त्यांस नगर येथे हलविण्यात आले. पाठीत व तोंडावर गंभीर जखमा झाल्या असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.