भक्ती ही पाण्यासारखी स्वच्छ असावी ः हभप कांबळे
पारनेर तालुक्यातील करंदी येथे 39 व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगताप्रसंगी आयोजीत काल्याच्या किर्तनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी परिसरातून मोठ्या प्रमाणावर महिला भाविक उपस्थित होते.
हभप कांबळे पुढे बोलताना म्हणाले की, पुराणामध्ये सांगितलेल्या कृष्णलिला या समाजप्रबोधनाची रूपके आहेत. मात्र कलियुगामध्ये गैर अर्थ घेत परमार्थावरच शंका घेतली जाते.
आपले धर्म ग्रंथ हे सांस्कृतिक शिक्षण दिणारे विद्यापीठ आहे. यासाठी धर्म ग्रंथाचा आदर करा. भजन किर्तन यामधून समाजामध्ये एकोपा निर्माण होतो. समाजामधील वाढत चाललेल्या अपप्रवृत्तीला दूर ठेवण्यासाठी परमेश्वर भक्तीची कास धरा. युवा वर्गाने मातापित्याची सेवा प्रामाणिकपणे करा, जीवनात काहीच कमी पडत नाही. छत्रपतींच्या राज्यामध्ये स्त्रियांचा सन्मान झालाच पाहीजे, मात्र समाजाला स्त्रीभृण हत्येची किड लागली लागून समाज रसातळाकडे चालला असून स्वतःचा सर्वनाश करून घेत असल्याचे सांगून हभप कांबळे पुढे म्हणाले की, जगाचा पोशिंदा शेतकरी हा सन्मानाने जगला पाहीजे. यासाठी ही त्या निर्मात्याने संबधितांना सुबुद्धी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली.