विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यानी सभागृहात लक्षवेधी मांडण्यासाठी एका व्यक्तीकडून पैसे घेतल्याचा आरोप करीत सत्ताधारी पक्षाने आरडाओरड करीतच सभागृहात प्रवेश केला. सभागृह अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसुन नेमके म्हणणे मांडण्याची सुचना केली. त्यावर सदस्यांनी आपले आसन ग्रहण केले त्याचवेळी सभागृहात धुळे येथील आमदार अनिल गोटे यांनी मुंडे यांनी सभागृहात लक्षवेधी मांडण्यासाठी एका व्यक्तीकडून पैसे घेतल्याचा गंभीर आरोप केला. यावेळी बातमीतील सिडीचा उल्लेख करुन मुंडे यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली. अनिल गोटे यांना सभागृहात सुनिल प्रभु यांनीही साथ देत निलंबनाच्या कारवाईची मागणी केली. परंतु सभागृहात सत्ताधारी गटाकडूनच गोंधळ झाल्याने अध्यक्षांनी सभागृह कामकाज वीस मिनिटांसाठी तहकूब केले. यानंतर पुन्हा सभागृह सुरु झाले, तेव्हा अजित पवार यांनी बातमीतील कथित सिडी बनावट असल्याचे सांगून या सिडीचा उल्लेख असलेले मुंडे, एक आमदार व विधान परिषद सचिव यांच्या नावाचा उल्लेख आला आहे, परंतु या तिघांचाही आवाज त्या कथित सिडीत नसल्याचे त्यांनी सां गितले. यासाठी मुख्यमंत्र्यांसह पाच सदस्यांची एक समिती बनवून त्यांनी ही कथित सिडी पहावी. सिडी बनावट असल्याचे स्पष्ट मत नोंदवून पवार यांनी अशा प्रकारच बनावट आरोप करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी म्हटले. यानंतर सभागृहात पुन्हा गोंधळाला सुरुवात झाली. सभागृहातील सदस्यांची घोषणाबाजी पहाता अध्यक्षांना सभागृहाचे कामकाज पुढे चालविणे उचित वाटले नाही. मग त्यांनी सभागृह 5 मार्च 2018 पर्यंत तहकूब केल्याची सुचना मांडली.
लक्षवेधीसाठी पैसे घेतल्याचा सत्ताधार्यांचा मुंडेंवर आरोप.
Reviewed by Dainik Lokmanthan
on
22:00
Rating: 5