Breaking News

नारायण राणे यांना भाजपची राज्यसभेची ऑफर

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्याने पुन्हा त्यांच्या मंत्रिमंडळ समावेशाची चर्चा सुरू झाली होती. तर दुसरीकडे राणे यांची राज्यसभेची ऑफर देण्यात आल्याच्या चर्चा होती. मात्र गुरूवारी राणे यांनीच राज्यात मंत्रिपदाचा निर्णय होईपर्यंत खासदारकी स्वीक ारण्याची भाजपकडून ऑफर असल्याची माहिती दिली. राणे यांचे कोणामुळे काहीही अडलेले नाही. राणे यांची काम सुरळीत सुरु आहे. राणेंची कोणाला चिंता नको. काल मी आ णि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत भेटलो आणि चर्चा केली. त्यावेळी चांगली चर्चा झाली, असे राणे म्हणालेत.

भाजपच्या मुख्यमंत्र्यांची परिषद दिल्लीत असल्याकारणाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौर्‍यावर होते. या बैठकीनंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे दिल्लीत दाखल झाले. त्यानंतर भाजप अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार आणि नारायण राणे यांच्यात बैठक पार पडली. नारायण राणे यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश करावा अशी मागणी केली तर राणे यांना राज्यसभेवर पाठवायचे याबाबत या बैठकीत चर्चा झाली. 23 मार्च रोजी एकूण राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. शिवसेना, कॉग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी एका जागेवर आपला उमेदवार निवडून आणू शकतात तर संख्याबळानुसार भाजपच्या कोट्यातून तीन जणांची वर्णी लागू शकते. मंत्रिमंडळ समावेशावरून राणे यांनी भाजपला अनेक वेळा इशारा दिला होता. तर नारायण राणेंचा लवकरच मंत्रिमंडळात समावेश करू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितले होते.