वरवंडी येथे हरिना सप्ताहाची उत्साहात सांगता
राहुरी विदयापीठ प्रतिनिधी - राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे प. पू. गुरुवर्य ह. भ. प. धोंगडे गुरुजी यांच्या कृपाशिर्वादाने ह. भ. प. मुळे महाराज यांच्या मार्गदर्शााखाली अखंड हरिााम सप्ताह आणि संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळ्याची काल {दि. २६} मोठ्या भक्तिभावाने सांगता झाली. यावेळी स्वामी रामानंदगिरी महाराज {पुणतांबा} यांचे काल्याचे कीर्तन झाले. या सप्ताह सोहळयामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांनी कीर्तन आणि प्रवचन सेवा पार पडली. वरवंडी गावात नव्याने बांधण्यात आलेल्या श्रीराम मंदिरात रविवारी {दि. २५} श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या सप्ताह कालावधीमध्ये गावातील वातावरण भक्तिमय होऊन गेले होते. संत तुकाराम महाराज गाथा पारायण आयोजित करण्याचे हे १२ वे वर्ष आहे.
दरम्यानन सप्ताह सोहळा यशस्वी होण्यासाठी माळी महाराज मोरे, सचिन महाराज मोरे या नामवंत गायकांसह अनिल महाराज सुर्यवंशी (मृदृंगाचार्य) यांच्यासह गोरक्षानाथ ढगे, जालिंदर अडसुरे, भानुदास ढगे, रमेश कदम, त्रिंबक अडसुरे, कैलास पवार, बाबासाहेब अडसुरे, लक्ष्मण बरे, लक्ष्मण शिंगाडे,नंदू भालेराव, श्रीकांत ढगे, उपसरपंच भास्कर काळे, दिगंबर ताकटे, दत्तू ढगे, साईनाथ कदम, दिगंबर अडसुरे आदीसंह पंचक्रोशीतील भजनी मंडळे, ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्था, कुक्कडवेढे, ह. भ. प. मच्छिंद्र महाराज भोगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनात महाप्रसादाची तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष पंगत शरद ढगे आणि गोरक्षनाथ पंडित यांनी दिली. शेकडो भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.