संदीप गुळवे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती
इगतपुरी,, दि. 27, मार्च - इगतपुरी तालुक्यातील भूमिपुत्र तथा जिल्हा बँकेचे संचालक अँड. संदीप गोपाळराव गुळवे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. या निवडीचे नियुक्ती पत्र आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिले. गुळवे यांच्यासह जिल्ह्यातील व तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी स्वागत केले. यावेळी नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अँड. संदीप गुळवे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, नाशिक जिल्हयासह संपुर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकटी करेन व पक्ष वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. सर्वांना सोबत घेऊन जिल्ह्यासह राज्याच्या कानाकोपर्यात पक्षाची विचारधारा पोहचवू. इगतपुरी तालुक्यात राष्ट्रवादी पक्षात नवचैतन्य निर्माण झाले आहे. संघटनात्मक शक्ती मजबूत करण्यासाठी अविरत प्रयत्न करू. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या स्वप्नपूर्तीला बळ देण्यात येईल, असे गुळवे यांनी सांगितले.