माजीमंत्री कोल्हेंच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्रतपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर
या शिबिरासाठी नीलवसंत रिसर्च व मेडीकल फाउंडेषनच्या डाॅ. प्राची पवार व त्यांचा उच्चशिक्षित प्रशिक्षित सर्व वैद्यकीय अधिकारी वर्ग आदींचे सहकार्य मिळत आहे. विवेक कोल्हे म्हणाले, की गेल्या पाच वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. आतापर्यंत ७ हजार रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करून ३ हजार रूग्णांना चष्म्याचे वाटप केले जाणार असून १ हजार रुग्नांवर डोळयांच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. दि. २४ मार्च रोजी माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांचा वाढदिवस आहे. ते नव्वदीत पदार्पण करीत आहेत. त्या निमित्ताने रवंदे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (दि. २४) कोकमठाण (दि. २५) राहाता तालुक्यातील जळगांव येथील सांस्कृतिक भवनात (दि. २७ ) व मूर्शतपूर (दि. २९ ) या चार ठिकाणी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले आहे.