Breaking News

महिलांनी आर्थिक प्रगतीसह संघटन करावे : विखे


शिर्डी/प्रतिनिधी - महिलांनी आता सर्वच क्षेत्रात पुढे आले पाहिजे. बचतगटाच्या माध्यमातून जि. प. अध्यक्षा शालिनी विखे यांच्या माध्यमातून आपण महिलांच्या पाठीशी राहू. कुटुंबाच्या प्रगतीबरोबरच महिलांनी स्वतःची ही आर्थिक प्रगती साधावी. या प्रगतीतून महिलांचे संघटन मजबूत करावे, असे आवाहन धनश्री विखे यांनी 

शिर्डीलगतच्या निमगाव ग्रामपंचायतीच्यावतीने महिलादिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सभापती हिरा कातोरे, सरपंच शिल्पा कातोरे, माजी सरपंच कल्पना जगताप, उपसरपंच अजय जगताप, ग्रामविकास अधिकारी आर. के. गायकवाड, अनिता जगताप, संगीता गाडेकर, रोहिणी कातोरे, रुबिना जगताप, कल्पना जगताप, स्वाती खरात, यमुना गाडेकर, रुपाली कातोरे, वर्षा गाडेकर, योगिता वदक, सिंधू गोसावी, चैताली कातोरे, छाया बर्डे, संगीता गाडेकर, मोहिनी कातोरे आदींसह ग्रामपंचायत महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी सभापती हिरा कातोरे यांचे भाषण झाले.