Breaking News

‘रयत’मध्ये कार्य भाग्यशाली बाब : आढाव


कोपरगाव ता. प्रतिनिधी - रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स कॉलेजच्या विकास समितीमध्ये निमंत्रित सदस्यपदी निवडीच्या निमित्ताने कार्य करण्याची संधी मिळाली, ही भाग्यशाली बाब आहे, असे प्रतिपादन विजयराव आढाव यांनी केले.

खा. शंकरराव काळे यांच्या आठवणी सांगून आढाव यांनी काळे कुटुंबियांच्या शैक्षणिक योगदानाची प्रशंसा केली. या निवडीबद्दल त्यांनी काळे कुटुंबियाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. रयत सेवक को. ऑप. बँक शाखा कोपरगावच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कौतूक सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी प्रा. संजय सांगळे भूगोलशास्त्र व प्रा. डी. एम. सूर्यवंशी {रसायनशास्त्र} विभाग यांचाही सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी रयत बँकेचे संचालक सुखदेव काळे हे होते. याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभाग सल्लागार सदस्य दीपक साळुंके, संदीप वर्पे आदींनी मनोगत प्रकट केले. यावेळी रयत बँक संचालक सुखदेव काळे, सुरेश वाबळे, काशिद शाखा व्यवस्थापक बाबुराव गाडे, अरविंद सालमुठे, बापू वडणे, डॉ. योगेश दाणे, प्रा. कडूस, विशाल निकम आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुरेश वाबळे यांनी केले. रयत बँकेच्या अध्यक्षा सुनीता वाबळे यांनी आभार मानले.