Breaking News

वसंतदादा शेतकरी साखर कारखाना : तीन मिळकतींचा आज जाहीर लिलाव


सांगली,  जिल्हाधिकारी सांगली यांच्या आदेशानुसार आर.आर.सी. वसुलीकामी वसंतदादा शेतकरी साखर कारखाना, सांगली येथील 3 मिळकतींची विक्री 20 मार्च रोजी जाहीर लिलावाद्वारे केली जाणार आहे. ही माहिती मिरजचे तहसिलदार शरद पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी सांगली यांच्या आदेशानुसार आर.आर.सी. वसुलीकामी विक्रीकर अधिकारी, विक्रीकर कार्यालय, सांगली यांच्याकडील एकूण 1 प्रकरणी लघुत्तम किंमत रु. 5,74,26,600/- इतकी कसुरदार, वसंतदादा शेतकरी साखर कारखाना, सांगली येथील मिळकत सि. स.न. 231/1, क्षेत्र 0.08.5 हे.आर या मिळकतीची लघुत्तम किंमत रु 89,37,600/- व सि. स.न. 231/2 ब, क्षेत्र 0.46.18 हे.आर या मिळकतीची लघुत्तम किंमत रु. 4,84,89,000/- तसेच, गट नं. 7 क्षेत्र 0.43.00 हे.आर या मिळकतींची लघुत्तम किंमत रु. 84,28,000/ या तिन्ही मिळकतीचा 20 मार्च रोजी सकाळी 11 वाजता मंडळ अधिकारी कार्यालय, सांगली येथे जाहीर लिलावाव्दारे विक्री केली जाणार आहे.