Breaking News

सुविधांपासुन अनेक दिव्यांग वंचीत - आमीन आगा


सातारा, दिव्यांगांना शासनाच्या कडून सुविधा दिल्या गेल्या आहेत.त्या सुविधाची माहिती पोहचवण्याचे काम दिव्यांग संघटनेच्या माध्यमातुन केले जात आहे. परंतु वेळेत आवश्यक ती कागदपत्रे पोहोचत नसल्याने या सुविधापासून अनेक दिव्यांग बांधव वंचीत राहात आहेत. वेळेत कागदपत्रांची पुर्तता करुन त्याचा लाभ सर्व दिव्यांग बांधवांनी घ्यावा, असे प्रतिपादन दिव्यांग संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आमीन आगा यांनी केले. 

खटाव येथील हनुमान मंदिरामध्ये लिंब खाण्याचा कार्यक्रम तसेच जिल्हा परिषद व पं.स.च्या माध्यमातुन 3 टक्के दिव्यांग निधीतुन दिव्यांगांसाठी मिळणा-या साहित्याचे वाटप करण्यात आले. राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघ सातारा जिल्हा अध्यक्ष आमीन आगा यांचे तसेच अजीत पाटेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद व पंचायत समिती 3 टक्के दिव्यांग निधीतुन नारायण गणपत पाटोळे यांना शिलाई मशीन ,निलोफर आयाज शिकलगार ,यांना घरगंटी ,पंचायत समिती 3 टक्के शेष फंडातुन शालन पवार ,सुहासिनी डेगंळे ,विरु आवळे ,यांना शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले. तर गणपत शिर्के यांना कुबडीचे वाटप करण्यात आले.