Breaking News

न्यायालयाच्या आदेशानुसारच शिक्षकांचे पगार : तावडे


मुंबई : शिक्षकांच्या पगाराबाबतीत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे पालन करण्यास राज्य सरकार बांधील आहे. न्यायालयाच्या निकालाची अधिकृत प्रत उपलब्ध झाल्यानंतर विधी व न्याय खात्याच्या अभिप्रायानुसार कारवाई करण्यात येत आहे. शिक्षकांची पूर्वी असलेल्या बँकेतील खाती नवीन खात्यामध्ये बदलण्याची प्रक्रिया सुरू असून त्यासाठी थोडा वेळ लागत आहे. शिक्षकांचे पगार होणे अतिमहत्त्वाचे आहे. कोणत्याही शिक्षकाचे नुकसान होणार नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन होईल, याची क ाळजी सरकार घेईल.