Breaking News

बाटलीबंद पाण्यात प्लॅस्टिकचे सूक्ष्म कण


नवी दिल्ली : बाटलीबंद पाण्याच्या गुणवत्तेसंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जगातील तब्बल 90 टक्के बाटलीबंद पाण्यात प्लास्टिकचे सूक्ष्म कण आढळून आले आहेत. न्यूयॉर्कच्या स्टेट युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी हे परीक्षण केले आहे. न्यूयॉर्क येथील स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या या परीक्षणात, भारतातील बिस्लेरी, अ‍ॅक्वा फिना आणि ईव्हियन या कंपन्यांचा समावेश आहे. जगातील 9 देशांतील ऐकूण 11 मोठ्या कंपन्यांच्या 259 बाटल्यांचे परीक्षण या संशोधकांनी केले आहे. या परीक्षणासाठी दि ल्ली, चेन्नई आणि मुंबईसह जगातील 19 शहरांतील नमुने गोळा करण्यात आले होते. यात 1 लिटर पाण्याच्या बाटल्यांमध्ये 10.4 मायक्रोप्लास्टिकचे कण आढळून आले आहेत.