डॉ. भूषण बिबवे यांचा नवी दिल्लीत सन्मान
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते समारंभाचे उदघाटन झाले. डॉ. बिबवे यांनी जवस (ओमेगा ३) तेलाचे संरक्षण या विषयावर सादर केलेला शोध प्रबंध हवेच्या संपर्कानंतरही औषधी जवस तेल उपयुक्त असल्याचे संशोधन केल्याबद्दल प्रसिद्धीपत्रक व पदवी देऊन त्यांना सन्मानीत करण्यात आले. यावेळी कृषी अनुसंधान व शिक्षण विभाग सचिव डॉ. त्रिलोचन महापात्र, डॉ.ए.के. सिंग उपस्थित होते. डॉ. भूषण बिबवे केंद्रीय टंचाई अंशतः औद्योगिक संस्थान अंभोर पंजाब येथे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे.
Post Comment